महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त भाटगाव विद्यालयात आकर्षक फलक रेखाटनातून शुभेच्छा:
महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथे कलाशिक्षक देव हिरे यांनी शालेय दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून सुंदर फलक रेखाटून शुभेच्छा दिल्या.
नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी शाळेच्या दर्शनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातून आकर्षक आणि देखणे फलक रेखाटन साकारत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
संदेशातून महाराष्ट्राचा गौरव
फलकावर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने घडलेला, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या घामाने बहरलेला आणि तथागत भगवान बुद्धांच्या अहिंसा, करुणा, सत्य व शांततेच्या विचारांनी समृद्ध झालेला महाराष्ट्र हा आपला अभिमान असल्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
या सुंदर रेखाटनामुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रीय व सामाजिक दिन विशेष पद्धतीने साजरे करण्याची शाळेची परंपरा यानिमित्त पुन्हा जपली गेली.
कला आणि संस्कारांचा संगम
कलाशिक्षक देव हिरे यांच्या या सर्जनशील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास, सामाजिक मूल्ये आणि सांस्कृतिक परंपरांची ओळख कलात्मक माध्यमातून झाली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0