महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात बदल; आता ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात शासन निर्णयानुसार बदल करण्यात आला असून, यापुढे आयोगाचा उल्लेख ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ असा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे. आयोगाने सर्व पत्रव्यवहार आणि संपर्कासाठी नव्या नावाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

May 20, 2026 - 23:24
 0  24
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात बदल; आता ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, आयोगाचे नाव बदल,

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात शासन निर्णयानुसार महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापुढे आयोगाचा उल्लेख ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ असा स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे सदस्य सचिव एस. एन. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या बदलानुसार आता कोणताही अधिकृत पत्रव्यवहार, संपर्क किंवा प्रशासकीय संदर्भ देताना आयोगाच्या नव्या नावाचा वापर करणे आवश्यक राहणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार आयोगाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

आयोगासाठी पत्रव्यवहाराचा पत्ता देखील जाहीर करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे –

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग

प्रशासकीय इमारत, पहिला मजला,

डेअरी विभाग, अब्दुल गफार खान मार्ग,

वरळी सीफेस, मुंबई.

प्रशासन, विविध विभाग तसेच संबंधित नागरिकांनी यापुढे आयोगाच्या नव्या नावाचा वापर करावा, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1