महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजवंदन सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील विधान भवन येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.

May 1, 2026 - 17:27
 0  10
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजवंदन सोहळा उत्साहात संपन्न
विधान भवन मुंबई, महाराष्ट्र दिन, प्रा राम शिंदे

मुंबई, दि. १ मे : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील विधान भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन सोहळा पार पडला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या सर्वांच्या पवित्र स्मृतीस सभापती प्रा. राम शिंदे यांनी अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.

प्रा. राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक भविष्यातही कायम राहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहणे आवश्यक आहे. त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव श्रीमती मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव डॉ. विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये, सहसचिव नागनाथ थिटे, सहसचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, सुभाष नलावडे, उपसचिव रविंद्र जगदाळे, उमेश शिंदे, मोहन काकड यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राखीव सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दि

ली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0