मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि अभिषेक लोढा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेऊन नवरात्रीनिमित्त अंबेमातेची मूर्ती भेट दिली.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतली सदिच्छा भेट
नवरात्रीनिमित्त अंबेमातेची मूर्ती सप्रेम भेट
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि अभिषेक लोढा यांनी नुकतीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अंबेमातेची मूर्ती सप्रेम भेट दिली.
या सदिच्छा भेटीदरम्यान नवरात्रीच्या शुभपर्वाचे औचित्य साधून अंबेमातेची मूर्ती भेट देण्यात आली. या भेटीची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.
Mi Marathi Live — स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज!