अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना; १ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरविण्यासाठी योजना राबविण्यात येत असून इच्छुकांनी १ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

May 18, 2026 - 18:54
 0  3
अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना; १ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मिनी ट्रॅक्टर योजना, कोल्हापूर समाज कल्याण, अनुसूचित जाती योजना,

कोल्हापूर, दि. १८ (जिमाका) :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी इच्छुक बचत गटांनी १ जूनपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत बचत गट पुरुष किंवा महिलांचा असू शकतो. संबंधित बचत गटाची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कृषी विभागाकडे असणे आवश्यक आहे. बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असणे बंधनकारक आहे.

अर्जासोबत जातीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते तपशील, ताळेबंद प्रमाणपत्र, रेशन कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. बचत गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त स्वरूपात असणे आवश्यक आहे.

मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांची कमाल किंमत ३.५० लाख रुपये राहणार असून त्यापैकी ९० टक्के म्हणजे ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित १० टक्के म्हणजे ३५ हजार रुपये बचत गटाने भरायचे आहेत.

अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0