अल्पवयीन मुलावर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; शिवाजीनगर पोलीस ठाणे कारवाई

अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर जबरदस्तीने अमानवी कृत्ये केल्याच्या गंभीर प्रकरणात मुख्य आरोपीस गुन्हे शाखेने अटक केली.

Apr 19, 2026 - 04:02
 0  6
अल्पवयीन मुलावर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत; शिवाजीनगर पोलीस ठाणे कारवाई
शिवाजीनगर पोलीस ठाणे कारवाई

मुंबई ब्यूरो - अनिल सावरे 

मुंबई : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने भीक मागण्यास लावणे व त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपीला शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष 06 पथकाने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने तृतीयपंथी बनविले. तसेच आर्थिक फायद्यासाठी त्याला लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यास भाग पाडले. याशिवाय मुलाला मुलींचे कपडे घालून पुरुष ग्राहकांसोबत जबरदस्तीने लैंगिक कृत्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), पॉक्सो कायदा, तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना कक्ष 06 चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी नवी मुंबईतील वाशी परिसरात लपून बसला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला.

मात्र आरोपीला संशय आल्याने तो साथीदारांसह कारमधून मुंबईच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी पाठलाग करून ट्रॉम्बे येथील पांजरापोळ जंक्शन परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग उघड झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध यापूर्वीही अपहरण, मारहाण व इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0