महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन! १ मेपासून मुंबई–पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून मुंबई–पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मेपासून मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. राज्याच्या पायाभूत विकासातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन कामांची पाहणी केली.
प्रवासात ३० मिनिटांची बचत
या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे दरम्यानच्या प्रवासात सुमारे ३० मिनिटांची वेळ बचत होणार आहे. घाटातील धोकादायक वळणे टाळून वाहनचालकांना अधिक सुरक्षित मार्ग उपलब्ध होणार आहे.
आशियातील सर्वांत मोठ्या बोगद्याचा अनुभव
मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यात आशियातील सर्वांत मोठ्या बोगद्यांपैकी एक बोगदा समाविष्ट आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
नेतृत्वामुळे प्रकल्प पूर्णत्वास
मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक टप्पा
मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ रस्ते प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि वाहतूक विकासाला चालना देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0