डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये सायकल राईड उत्साहात संपन्न

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त सायकल राईड; शालिमार ते पाथर्डी फाटा मार्गावर उत्साहात आयोजन.

Apr 14, 2026 - 23:54
 0  2
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये सायकल राईड उत्साहात संपन्न
नाशिक सायकल राईड, आंबेडकर जयंती, सायकलिस्ट फाउंडेशन, नाशिक कार्यक्रम, बैसाखी सण

नाशिक ब्यूरो 

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित सायकल राईड १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.

या राईडची सुरुवात शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून करण्यात आली. सायकलिस्ट बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ठरलेल्या मार्गाने पाथर्डी फाटा येथील आंबेडकर स्मारकापर्यंत राईड पूर्ण केली.

यावेळी सहभागी सर्वांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

तसेच, बैसाखी सणानिमित्त पंजाबी नववर्षाचेही उत्साहात स्वागत करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष अमित नारायण घुगे, उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला, संचालक माधुरी गडाख, सीमा घुगे, कारभारी भोर आणि सुरेश डोंगरे यांच्यासह अनेक सायकलप्रेमी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0