नाशिक ते कोटमगाव सायकलवारी २०२६ उत्साहात; १७५ सायकलिस्ट सहभागी

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि क्रीडा भारतीच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ते कोटमगाव सायकलवारी उत्साहात संपन्न. १७५ सायकलिस्ट सहभागी; लकी ड्रॉमध्ये पैठणी व आकर्षक भेटवस्तू.

नाशिक ते कोटमगाव सायकलवारी २०२६ उत्साहात; १७५ सायकलिस्ट सहभागी
नाशिक सायकलवारी २०२६, नाशिक ते कोटमगाव सायकलवारी, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, क्रीडा भारती नाशिक, १७५ सायकलिस्ट, कोटमगाव सायकलवारी

नाशिक ब्यूरो:

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि क्रीडा भारतीचा संयुक्त उपक्रम; लकी ड्रॉमध्ये पैठणी, चांदीच्या वस्तूंसह आकर्षक भेटवस्तूंचे वितरण

नाशिक, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि क्रीडा भारती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नाशिक ते कोटमगाव सायकलवारी २०२६’ रविवारी उत्साहात पार पडली. या सायकलवारीत तब्बल १७५ सायकलिस्ट सहभागी झाले. सायकलिंगचा प्रसार, आरोग्याविषयी जागरूकता आणि सायकलप्रेमींमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी ६ वाजता नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, प्रवीणकुमार खाबिया आणि फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकलवारीला सुरुवात करण्यात आली. देवीच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या सायकलवारीत सायकलप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला.

निफाड आणि विंचूर येथे सायकलिस्टचे स्वागत

सायकलवारीच्या मार्गावर निफाड येथे निफाड सायकलिस्ट परिवाराच्या वतीने, तर विंचूर येथे सुनील मालपाणी यांच्या वतीने सहभागी सायकलिस्टचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रवासादरम्यान सहभागींसाठी नाश्त्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

निफाड रिव्हरसाइड गोल्फ कोर्सचे अध्यक्ष व निवृत्त विंग कमांडर प्रदीप वाघमारे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष रवींद्र नाईक, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक हरीश बैजल, माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया व राजेंद्र वानखेडे, निफाड सायकलिस्टचे अध्यक्ष पांडुरंग कडवे आणि प्रवीण तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहभागींचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्व सायकलिस्टना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

लकी ड्रॉ ठरले आकर्षणाचे केंद्र

सायकलवारीदरम्यान आयोजित लकी ड्रॉमध्ये विविध प्रायोजकांच्या सहकार्याने आकर्षक भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. सौ. डॉ. प्रतिभा उमेश भदाणे यांच्या वतीने देण्यात आलेल्या मानाच्या पैठणीच्या विजेत्या सौ. शीतल कानडे ठरल्या.

या उपक्रमात सुरेश डोंगरे यांच्या वतीने पाच चांदीच्या भेटवस्तू, आदित्य स्पोर्ट्सच्या वतीने दहा भेटवस्तू आणि अश्विनी ज्वेलर्सच्या वतीने पाच चांदीच्या भेटवस्तू देण्यात आल्या. कापसे पैठणीच्या सहकार्याने आणि फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर काळे यांच्या विशेष प्रयत्नांतून ११ पैठणी साड्या देण्यात आल्या.

याशिवाय शुभम भालेराव यांच्या वतीने दहा, राकेश अपसुंदे यांच्या वतीने पाच, सौरभ काळे यांच्या वतीने चार, योगेश बिरारी यांच्या वतीने चार आणि माणिक काठे यांच्या वतीने चार भेटवस्तू देण्यात आल्या. सुगंधा व्यवहारे यांनी सहभागी महिलांना विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.

आयोजकांचे विशेष परिश्रम

सायकलवारी यशस्वी करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे, उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला, सचिव नितीन कोतकर, वारीप्रमुख शीतल कानडे, सुरेश डोंगरे आणि सौरभ काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच संचालक मंडळातील अश्विनी कोंडेकर, दीपली माळी, सीमा घुगे, कारभारी भोर, शुभम भालेराव, राकेश अपसुंदे आणि सर्व सहभागी सायकलिस्ट यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. उत्साही सहभाग, मार्गावरील स्वागत आणि भेटवस्तूंच्या वितरणामुळे नाशिक ते कोटमगाव सायकलवारी २०२६ संस्मरणीय ठरली.

Mi Marathi Live — स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज!