राष्ट्रीय लोकअदालतीत 3 हजार 762 प्रकरणे निकाली; 64 कोटी रुपयांची तडजोड रक्कम वसूल
नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 3 हजार 762 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये सुमारे 64 कोटी रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती सचिव सतीश हिवाळे यांनी दिली.
नाशिक ब्यूरो : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्या वतीने 9 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील एकूण 3 हजार 762 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या प्रकरणांमध्ये तडजोडीअंती तब्बल 64 कोटी 9 लाख 41 हजार 847 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ही राष्ट्रीय लोकअदाल आयोजित करण्यात आली होती. नाशिक जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयांमध्ये लोकअदालतीसाठी एकूण 49 पॅनेलची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पॅनेल प्रमुख, सदस्य आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण 39 हजार 598 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 214 प्रकरणे निकाली निघाली असून सुमारे 3 कोटी 15 लाख 64 हजार 478 रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायालयातील प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणांचा एकत्रित विचार करता एकूण 3 हजार 762 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
मोटार वाहन चालकांना मोठा दिलासा
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एकूण 2 हजार 487 प्रकरणांपैकी 354 प्रकरणे निकाली निघाली. त्यामुळे संबंधित वाहनचालकांना न्यायालयीन प्रक्रियेपासून मोठा दिलासा मिळाला.
निकाली निघालेल्या प्रमुख प्रकरणांचा आढावा
परक्राम्य संलेख अधिनियम कलम 138 अंतर्गत – 473 प्रकरणे
मोटार अपघात प्रकरणे – 156
कामगार विषयक – 1
कौटुंबिक वाद – 32
फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे – 200
इतर प्रकरणे – 2900
राष्ट्रीय लोकअदालतीमुळे न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास मदत झाली असून नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0