नाशिकमध्ये ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात पार; १५०० खेळाडूंचा सहभाग

नाशिक येथे आयोजित ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात पार पडली. राज्यभरातील सुमारे १५०० खेळाडूंनी सहभाग घेतला असून विविध गटांतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

नाशिकमध्ये ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात पार; १५०० खेळाडूंचा सहभाग
नाशिकमध्ये ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा

नाशिक ब्यूरो :

क्रीडा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये २ आणि ३ मे २०२६ रोजी ४ थी राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा उत्साहात पार पडली. “उत्साहाने धावा, अभिमानाने जिंका” या ब्रीदवाक्याखाली आयोजित या स्पर्धेने राज्यभरातील खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी (पंचवटी) येथील धावपट्टीवर झालेल्या या स्पर्धेत राज्यातील सुमारे ३० जिल्ह्यांमधून जवळपास १५०० खेळाडूंनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे स्वरूप

या दोन दिवसीय स्पर्धेत ६ ते १८ वर्षे व खुल्या गटातील मुला-मुलींसाठी एकूण ९८ क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरली.

उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेचे उद्घाटन हर्षवर्धन सदगीर, किसन तडवी, रविंद्र नाईक आणि नितीन मुलतानी यांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांनी खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले.

समारोप सोहळा

स्पर्धेचा समारोप प्रशांत बच्चाव, अद्विता शिंदे, नायडू मॅडम आणि राजश्री सुरावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

विजेते खेळाडू (वयोगटानुसार)

६ वर्षे: मुले – सोहम हानवते | मुली – स्पृहा घाग

८ वर्षे: मुले – जियांश पाटील | मुली – इरा कावा

१० वर्षे: मुले – जियांश सुधीर पाटील | मुली – अलंक्रिता अनिल

१२ वर्षे: मुले – राजवीर कचरे | मुली – एरिना अय्यर

१४ वर्षे: मुले – कय्युम चव्हाण | मुली – तनुश्री गदार

१६ वर्षे: मुले – आर्यन महिंद्रा | मुली – अनुष्का माजी

१८ वर्षे: मुले – ह्युमन खान | मुली – मेघा प्रमोद

खुला गट: पुरुष – बादल कटारे | महिला – वैदू कडू

उत्कृष्ट खेळाडू आणि प्रशिक्षक

संपूर्ण स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू म्हणून राजवीर कचरे, ह्युमन खान आणि तनुश्री गदार यांची निवड करण्यात आली.

उत्कृष्ट प्रशिक्षक (कोच) म्हणून स्नेहल राजपूत यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेमुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून, भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.