नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील हाय-स्पीड महामार्ग प्रकल्पांचा आढावा

नितीन गडकरी, महाराष्ट्र महामार्ग प्रकल्प, हाय स्पीड हायवे, राष्ट्रीय महामार्ग, नागपूर प्रकल्प, पुणे सातारा हायवे, BOT प्रकल्प, रस्ते विकास, भारत इन्फ्रास्ट्रक्चर

May 4, 2026 - 22:14
 0  10
नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील हाय-स्पीड महामार्ग प्रकल्पांचा आढावा
नितीन गडकरी, महाराष्ट्र महामार्ग प्रकल्प, हाय स्पीड हायवे

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणे, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत नागपूर-भंडारा सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर चार पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडॉर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडॉर, नागपूर-हैदराबाद कॉरिडॉर, भंडारा-रायपूर सहा पदरीकरण, लखनादोन-दुर्ग-रायपूर कॉरिडॉर, नागपूर-अमरावती सहा पदरीकरण तसेच एनएच-44वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा ते नागपूर बायपास-बोरखेडी आणि पुणे-सातारा सहा पदरीकरण या प्रकल्पांचा समावेश होता.

याशिवाय महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील सुमारे ५२७ किमी लांबीच्या नऊ बीओटी प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर-वडाळा, वडाळा-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, जालना-वातूर, नांदेड-नरसी-देगलूर, जाम-वरोरा, वरोरा-चंद्रपूर-बामणी आणि मलकापूर-चिखली या कॉरिडॉरचा समावेश आहे.

या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0