पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा मिश्रित गोळ्या आणि गुटखा जप्त; २.४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजा मिश्रित गोळ्या आणि प्रतिबंधित गुटखा असा २ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

May 10, 2026 - 01:09
 0  12
पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा मिश्रित गोळ्या आणि गुटखा जप्त; २.४१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी चिंचवड पोलीस, गांजा मिश्रित गोळ्या, गुटखा जप्त

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड, दि. ९ मे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजा मिश्रित गोळ्या आणि महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकूण २ लाख ४१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास दक्षिण चाकण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. �

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. 

गोपनीय माहितीच्या आधारे नाणेकरवाडी परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी राहुलसिंग हेमराजसिंग लोधी (वय २५) याच्याकडून १ लाख ६६ हजार ९७० रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, ६४ हजार ८०० रुपयांच्या १४९.७१५ ग्रॅम गांजा मिश्रित गोळ्या तसेच एक मोबाईल फोन असा एकूण २ लाख ४१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी आरोपीविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्ट १९८५ अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

ही कारवाई पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता. 

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0