पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण; नागरिकाभिमुख सेवेला मिळणार अधिक गती

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा-२ कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते झाले. आधुनिक सुविधा, सुसज्ज कार्यालयीन वातावरण आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे नागरिकाभिमुख सेवेला अधिक गती मिळणार आहे.

Aug 6, 2026 - 02:42
 0  9
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण; नागरिकाभिमुख सेवेला मिळणार अधिक गती
पिंपरी चिंचवड पोलीस, विशेष शाखा-२, कार्यालयाचे नूतनीकरण, विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय,

प्रतिनिधी :  रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड, दि. ४ : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक सुविधा, सुसज्ज कार्यालयीन वातावरण आणि अधिक प्रभावी कार्यपद्धतीमुळे नागरिकांना जलद, सुलभ व पारदर्शक सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार विशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कार्यालयाची कार्यक्षमता वाढविणे तसेच अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या कार्यासाठी अधिक पोषक आणि व्यावसायिक वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने कार्यालयीन पोशाखातही बदल करण्यात आला आहे.

नवीन पोशाखानुसार पोलीस अधिकाऱ्यांसाठी पांढरा शर्ट व काळी पँट, तर पोलीस अंमलदारांसाठी फिकट निळ्या रंगाचा शर्ट व त्याच रंगाची पँट निश्चित करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा लोगो असलेला कोटही निश्चित करण्यात आला आहे. या बदलामुळे कार्यालयीन शिस्त, एकसंधता आणि व्यावसायिकता अधिक प्रभावीपणे अधोरेखित होणार असल्याचे सांगण्यात आले.

विशेष शाखा-२ कार्यालयाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ ४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते नूतनीकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर फीत कापून नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदारांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने आणि समर्पित भावनेने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

आधुनिक सुविधा, सुसज्ज कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही पोलीस आयुक्त चौबे यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. बबनराज तेली, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) रोहितस पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) धीरज पाटील, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) गणेश इंगळे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) सुनील पंढरकर, सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) संजय ननावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-२ तसेच सहायक पोलीस निरीक्षक रोजी पवार आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विशेष शाखा-२ कार्यालयाच्या नूतनीकरणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सुसज्ज आणि कार्यक्षम वातावरण उपलब्ध होणार असून, नागरिकांना अधिक वेगवान, पारदर्शक व परिणामकारक सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.