राष्ट्रीय सैनिक संस्था विदर्भाच्या सचिवपदी प्रशांत गावंडे यांची नियुक्ती

राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या विदर्भ सचिवपदी प्रशांत निळकंठराव गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी सैनिकांचे प्रश्न आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी ते कार्य करणार आहेत.

May 7, 2026 - 21:39
 0  7
राष्ट्रीय सैनिक संस्था विदर्भाच्या सचिवपदी प्रशांत गावंडे यांची नियुक्ती
प्रशांत गावंडे, राष्ट्रीय सैनिक संस्था, विदर्भ सचिव

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे 

यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक व राष्ट्रभक्तीपर कार्यात सक्रिय असलेले प्रशांत निळकंठराव गावंडे यांची राष्ट्रीय सैनिक संस्था विदर्भाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य मुख्यालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून विदर्भातील संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा नॅशनल कौन्सिल मेंबर मा. हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ येथील राज्य मुख्यालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात प्रशांत गावंडे यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विदर्भातील माजी सैनिकांचे प्रश्न, सैनिकी कुटुंबांच्या अडचणी आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी गावंडे कार्यरत राहणार असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना प्रशांत गावंडे म्हणाले की, “ही केवळ पदाची जबाबदारी नसून राष्ट्रकार्याची नवी संधी आहे. माजी सैनिकांचा अनुभव आणि युवकांचा उत्साह यांची सांगड घालून विदर्भात समाजसेवा आणि राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय सुरू करू.”

या नियुक्तीमुळे विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून गावंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0