पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदानानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतला विसावा!

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी विसावा घेतला. गेल्या १२ ते १३ दिवसांपासून उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदानानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतला विसावा!
पुणे पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघ, भाजप, पिंपरी चिंचवड, चिंचवड, स्मिताताई जाधव, कौस्तुभ गावडे, अमित गोरखे, उमा खापरे, फत्तेचंद जैन हायस्कूल, महाराष्ट्र निवडणूक २०२६

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या मतदानानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतला विसावा!

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी), दि. २३ ऑक्टोबर २०२६ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गेल्या १२ ते १३ दिवसांपासून अहोरात्र धावपळ करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर चिंचवड येथे काही काळ विसावा घेतला.

पिंपरी विभागातील मतदान केंद्र चिंचवड येथील फत्तेचंद जैन हायस्कूलमध्ये होते. या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते.

भाजपच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे सर यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते गेल्या १२ ते १३ दिवसांपासून सक्रिय होते. प्रचार, मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीच्या कामातील धावपळीनंतर शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मतदान प्रक्रिया थांबल्यानंतर कार्यकर्त्यांनी फत्तेचंद जैन हायस्कूलजवळील बूथ परिसरात विसावा घेतला.

या वेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, सदाशिवराव खाडे सर, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक कैलास कुटे, नगरसेवक कुशाग्र कदम, माजी नगरसेवक नामदेव ढाके, माऊली सूर्यवंशी आणि मंडल अध्यक्ष मंगेश धाडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर एकत्र येत काही क्षण विश्रांती घेतली. यावेळी उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे छायाचित्रही काढण्यात आले.