रोथे एर्डे वाडीवा-हे कंपनीच्या दडपशाहीविरोधात कामगारांचा ३ जूनला मंत्रालयावर मोर्चा

रोथे एर्डे वाडीवा-हे कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर होत असलेल्या कथित दडपशाही, कामगार कायद्यांचे उल्लंघन आणि कामगार कपातीच्या विरोधात ३ जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय कामगारांच्या जनरल बॉडी बैठकीत एकमताने घेण्यात आला.

Jun 1, 2026 - 04:23
 0  11
रोथे एर्डे वाडीवा-हे कंपनीच्या दडपशाहीविरोधात कामगारांचा ३ जूनला मंत्रालयावर मोर्चा
रोथे एर्डे वाडीवा-हे, कामगार मोर्चा, मंत्रालय मोर्चा,

नाशिक ब्यूरो: 

पुणे : रोथे एर्डे वाडीवा-हे कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांवर सुरू असलेल्या कथित दडपशाही, कामगार कायद्यांचे उल्लंघन आणि कामगार कपातीच्या विरोधात येत्या ३ जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय कामगारांच्या जनरल बॉडी बैठकीत एकमताने घेण्यात आला.

सीआयटीयूचे जिल्हाध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली सीआयटीयू कामगार भवन येथे झालेल्या जनरल बॉडी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कामगारांच्या पसंतीच्या युनियनशी कंपनी व्यवस्थापनाने चर्चा करावी, कमी केलेल्या कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घ्यावे आणि कामगारांवरील दडपशाही थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

बैठकीत सीआयटीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. त्यांनी कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या शोषणाबाबत सविस्तर माहिती देत कामगारांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याचे आवाहन केले.

सीआयटीयूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे यांनी सांगितले की, सीआयटीयू संलग्न युनियनच्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. तुकाराम सोनजे यांनी कामगारांनी एकजुटीने राहून आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. तर युनियनचे सचिव कॉ. राहुल गायकवाड यांनी कंपनी व्यवस्थापनाकडून कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत शासन व कामगारांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

बैठकीस मोठ्या संख्येने रोथे एर्डे वाडीवा-हे कंपनीचे कामगार उपस्थित होते. मंत्रालयावर होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी कामगारांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.