शेगावात महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; विद्यार्थ्यांचे पथनाट्य आणि लेझीमने रंगत
शेगावात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे पथनाट्य, लेझीम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले.
बुलडाणा प्रतिनिधी -महेंद्र मिश्रा
शेगाव : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त शेगाव शहरात मोठ्या उत्साहात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महात्मा फुले विद्यालयाच्या वतीने आयोजित या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शोभायात्रेत महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना आकर्षक चित्ररथांवर आरूढ करण्यात आले होते. सर्वप्रथम या पुतळ्यांचे पूजन संस्थेचे अध्यक्ष संजय वामन कलोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर हिरवी झेंडी दाखवून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील शिवनेरी चौक, माणिक चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गजानन महाराज मंदिर परिसर, संविधान चौक, सावता चौक आदी प्रमुख मार्गांवरून शोभायात्रेने मार्गक्रमण केले.
शोभायात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध चौकांमध्ये समाजप्रबोधनपर पथनाट्य सादर केले. तसेच लेझीम पथकाने सादर केलेल्या नृत्याने वातावरणात उत्साह निर्माण झाला. अनेक विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा करून झाकीमध्ये सहभाग घेतला.
शहरातील नागरिकांनी रांगोळी काढून व अभिवादन करून शोभायात्रेचे स्वागत केले. विविध संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना चहा, नाश्ता, बिस्किटे, शीतपेय तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात lआले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0