शिवसेनेकडून शायना एन. सी. यांची प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती; पक्ष संघटन बळकटीसाठी महत्त्वाची जबाबदारी
शिवसेनेने शायना एन. सी. यांची प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली ही नियुक्ती १ मे २०२६ पासून एक वर्षासाठी लागू राहणार आहे. पक्ष संघटन मजबूत करणे आणि हिंदुत्वाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मुंबई प्रतिनिधी : मिलिंद कारेकर
शिवसेनेच्या नेत्या शायना एन. सी. यांची पक्षाच्या प्रभारी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून ती १ मे २०२६ पासून पुढील एक वर्षासाठी लागू राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत संघटनात्मक नियुक्तींना विशेष महत्त्व देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘शिवसंवाद दौऱ्या’च्या माध्यमातून शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जात असून नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शायना एन. सी. यांच्याकडे प्रभारी राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
येत्या काळात शायना एन. सी. यांच्याकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी विचारधारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य असेल. तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना जोडणे आणि शिवसेनेचा विस्तार करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पक्षाच्या आगामी संघटनात्मक धोरणामध्ये शायना एन. सी. यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असून त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या संघटन विस्तार मोहिमेला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0