राजधानीत छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आदरांजली वाहिली.
दिल्ली प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त राजधानी नवी दिल्ली येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी प्रमोद कोलापटे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. तसेच महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान याविषयी माहिती देण्यात आली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0