तृतीयपंथीय श्रीमती सोनाली चौकेकर यांना ‘स्वच्छता प्रेरक पुरस्कार’; सामाजिक कार्याचा गौरव

मुंबई येथे सामाजिक समता सप्ताह आणि राष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तृतीयपंथीय समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती सोनाली चौकेकर यांना ‘स्वच्छता प्रेरक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. समाजहितासाठी त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

Apr 30, 2026 - 02:00
 0  4
तृतीयपंथीय श्रीमती सोनाली चौकेकर यांना ‘स्वच्छता प्रेरक पुरस्कार’; सामाजिक कार्याचा गौरव
सोनाली चौकेकर, स्वच्छता प्रेरक पुरस्कार, तृतीयपंथीय गौरव

मुंबई | प्रतिनिधी | उदय कासारे 

दि. २९ एप्रिल २०२६ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता सप्ताहानिमित्त आणि राष्ट्रीय तृतीयपंथीय दिनाच्या औचित्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तृतीयपंथीय समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात श्रीमती फिदा खान यांना सेवाभावी कार्यासाठी ‘तृतीयपंथीय गौरव कौशल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल श्रीमती सोनाली चौकेकर यांना ‘स्वच्छता प्रेरक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

यानंतर श्रीमती सोनाली चौकेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच तृतीयपंथीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली.

तृतीयपंथीय समाजामध्ये समानता, सन्मान आणि मानवतेची भावना मजबूत करण्यासाठी सोनाली चौकेकर यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेकांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.

समाजहितासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या अशा कार्यकर्त्यांचा सन्मान हा अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0