उषा मंगेशकर, हरिहरन, संजीव कपूर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई येथे आयोजित 18 व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, गायक हरिहरन, शेफ संजीव कपूर, पत्रकार राही भिडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

May 2, 2026 - 23:51
 0  13
उषा मंगेशकर, हरिहरन, संजीव कपूर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
उषा मंगेशकर, हरिहरन, संजीव कपूर, जीवन गौरव पुरस्कार

मुंबई, दि. २ : ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, गझल व पार्श्वगायक हरिहरन, सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर, अभिनेत्री सुषमा देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे तसेच बीड जिल्ह्यात एचआयव्ही/एड्सग्रस्त मुलांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी कार्य करणारे दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथे शुक्रवारी (दि. १ मे) आयोजित सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हा पुरस्कार सोहळा आफ्टरनून व्हॉइस माध्यमातर्फे आयोजित 18 व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्यात पार पडला. यावेळी ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी डॉ. संध्या पुरेचा, अभिनेते व जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर, आफ्टरनून व्हॉइसच्या संपादिका डॉ. वैदेही तमन तसेच राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

समाजासाठी प्रेरणादायी कार्याचा गौरव

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केल्याने समाजाला प्रेरणा मिळते. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांचे कार्य समाजासाठी मार्गदर्शक आहे.

संजीव कपूर यांचा घरगुती जेवणाचा संदेश

सत्काराला उत्तर देताना शेफ संजीव कपूर यांनी “घरचे भोजन नेहमीच सर्वोत्तम असते” असा संदेश दिला. ते म्हणाले, “घरच्या जेवणात प्रेम असते, तर बाहेरच्या जेवणात व्यवहार असतो.”

हरिहरन यांनी गायनाने जिंकली मने

कार्यक्रमादरम्यान गायक हरिहरन यांनी ‘तू ही रे, तेरे बिना मैं कैसे जिऊँ’ हे लोकप्रिय गीत सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली.

महाराष्ट्राच्या प्रगत वारशाचा गौरव

राज्यपालांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राची भूमी प्रगतिशील विचार, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक असल्याचे सांगितले. राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा महान वारसा लाभल्याचे त्यांनी नमूद केले

आजही महाराष्ट्र उद्योग, संस्कृती, सुशासन आणि सामाजिक विकास क्षेत्रात देशाचे नेतृत्व करत असल्याचे सांगून समाजात प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन्मानित सर्व व्यक्तिमत्त्वे या मूल्यांचे जिवंत उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.