सलग १२ तास वाचनातून विद्यार्थ्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
बुलढाण्यात विद्यार्थ्यांनी सलग १२ तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.बुलढाण्यात विद्यार्थ्यांनी सलग १२ तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग.
विदर्भ ब्युरो अमोल सराफ
बुलढाणा : “वाचाल तर वाचाल” हा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. बुलढाण्यातील मृण्मयी मल्टीपर्पज क्लासेस आणि ध्रुव क्लासेसच्या वतीने सलग १२ तास वाचन करून हा उपक्रम पार पडला.
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम यंदाही उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी अभ्यासाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे तसेच सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक परिवर्तन घडवावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षीच्या उपक्रमात शहरातील विविध वयोगटातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सलग बारा तास वाचन आणि अभ्यास केला. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर होत असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा संदेशही प्रभावीपणे दिला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0