सैन्य दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण; ८ जूनपर्यंत मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांना महाराष्ट्र शासनातर्फे मोफत पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. १५ जून ते २८ ऑगस्ट दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या सीडीएस प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी ८ जूनपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे.

May 20, 2026 - 22:22
 0  8
सैन्य दलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण; ८ जूनपर्यंत मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना पूर्वतयारी करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सीडीएस (कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) कोर्स क्रमांक ६७ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक आणि युवतींनी ८ जूनपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्र

कोल्हापूर : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना पूर्वतयारी करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सीडीएस (कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) कोर्स क्रमांक ६७ आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक आणि युवतींनी ८ जूनपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना भारतीय सैन्यदलातील अधिकारी पदासाठी होणाऱ्या सीडीएस परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे यांच्या संकेतस्थळावरून CDS-67 कोर्सचे प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट तसेच संबंधित परिशिष्टे पूर्ण भरून सोबत आणावीत. संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फतही प्रवेशपत्राची प्रत उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

एसएसबी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी निर्धारित पात्रता निकषांपैकी किमान एक पात्रता आवश्यक असून त्यासंदर्भातील कागदपत्रे उमेदवारांनी सोबत आणावीत.

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असू शकतो. तसेच लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0