अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी महा-टीईटी क्रॅश कोर्स; १८ मेपासून गडचिरोलीत प्रशिक्षण

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी महा-टीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मे २०२६ पासून गडचिरोली येथे सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी QR कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

May 15, 2026 - 00:06
 0  5
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी महा-टीईटी क्रॅश कोर्स; १८ मेपासून गडचिरोलीत प्रशिक्षण
महा टीईटी, टीईटी क्रॅश कोर्स, आदिवासी विकास विभाग, गडचिरोली,

आदिवासी विकास विभाग यांच्या वतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी महा-टीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम १८ मे २०२६ पासून गडचिरोली येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) साठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, परीक्षाभिमुख प्रशिक्षण आणि निवासी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाण वाढावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील तसेच जून २०२६ मध्ये होणाऱ्या महा-टीईटी परीक्षेसाठी अर्ज किंवा नोंदणी केलेले उमेदवार पात्र असणार आहेत.

अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, सामाजिक व जातविषयक माहिती, शैक्षणिक पात्रता, नोकरीविषयक तपशील तसेच महा-टीईटी परीक्षेशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.

अर्जासोबत आधार कार्डची प्रत आणि जून २०२६ महा-टीईटी अर्ज किंवा नोंदणी पावती जोडणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी atc.ngp-mh@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संधीचा पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0