घाटकोपर (पश्चिम) जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत

घाटकोपर (पश्चिम) येथील निम्नस्तरीय जलाशयाची दुरुस्ती पूर्ण झाली असून १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.

Apr 8, 2026 - 19:48
Apr 8, 2026 - 20:26
 0  7
घाटकोपर (पश्चिम) जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत
Water Supply

विशेष वृत्त-

घाटकोपर (पश्चिम) येथील जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून पाणीपुरवठा पूर्ववत

मुंबई : घाटकोपर (पश्चिम) येथील निम्नस्तरीय जलाशयाच्या दोन्ही कप्प्यांची दुरुस्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आली असून १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

दुरुस्तीच्या कालावधीत पाणीपुरवठ्याच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला होता. मात्र, आता पूर्वीप्रमाणेच वेळेनुसार पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांना सूचना

प्रशासनाने नागरिकांना पुढील ५ दिवस पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा वेळा (दुरुस्तीनंतर)

नारायणनगर व एनएक्स-०३ क्षेत्र:
चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, न्यू माणिकलाल इस्टेट, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एस. मार्ग, खालाई गाव, किरोळ गाव, विद्याविहार (पश्चिम) आदी भागांमध्ये दुपारी ३.१५ ते सायंकाळी ७.१५ वाजेदरम्यान पाणीपुरवठा होईल.

पंतनगर आऊटलेट व एनएक्स-०६ क्षेत्र:
भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, सीजीएस वसाहत, गंगावाडी, एलबीएस मार्गालगतचा परिसर येथे सायंकाळी ६.४५ ते रात्री ११.०० वाजेदरम्यान पाणीपुरवठा करण्यात येईल.

सर्वोदय बुस्टींग व संबंधित क्षेत्र:
सॅनिटोरियम गल्ली, गांधीनगर, एच. आर. देसाई मार्ग परिसरात सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.१५ वाजेदरम्यान पाणीपुरवठा पूर्ववत सुरू राहील.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0