स्वातंत्र्यदिनी पुणे विधानभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे विधानभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
पुणे, दि. १५ ऑगस्ट २०२६ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे येथील विधानभवनात आज देशभक्तीमय वातावरणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना दिसून आली.
या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहण सोहळ्यास सैन्यदलातील अधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक आणि शहीदांच्या त्यागाचे स्मरण करत उपस्थितांनी देशाच्या अखंडता, एकता आणि प्रगतीप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0