अवैध दारूविरोधात संयुक्त कारवाईचा निर्णय; पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण पोलिसांचा समन्वय वाढणार

पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये अवैध दारू निर्मिती, विक्री आणि भेसळयुक्त मद्याविरोधात संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jun 6, 2026 - 22:29
 0  4
अवैध दारूविरोधात संयुक्त कारवाईचा निर्णय; पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण पोलिसांचा समन्वय वाढणार
अवैध दारू, पिंपरी चिंचवड पोलीस, पुणे पोलीस, संयुक्त कारवाई,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ५ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अवैध दारू निर्मिती, वाहतूक, विक्री तसेच भेसळयुक्त मद्याच्या साखळीवर संयुक्त आणि प्रभावी कारवाई करण्याचा निर्धार करण्यात आला.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे, पुणे शहर परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त चिलुमुल्ला रजनीकांत तसेच पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार उपस्थित होते.

बैठकीदरम्यान भेसळयुक्त दारू, हातभट्टी दारू, अवैध दारू गाळणी केंद्रे आणि बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला. विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवून अवैध दारूच्या संपूर्ण साखळीवर एकत्रित कारवाई करण्याची रणनीती निश्चित करण्यात आली.

अवैध दारूच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून संयुक्त पथकांमार्फत कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. तसेच गुप्त माहिती संकलन, त्वरित माहिती आदान-प्रदान आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीद्वारे अवैध मद्य व्यवसायाला आळा घालण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण भागात अवैध दारूविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यातील समन्वय आणखी मजबूत करण्यावर या बैठकीत एकमत झाले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0