कसबा पेठेत स्वच्छतेवर पालिकेचा दणका; दोन बेकऱ्यांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई

पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने संयुक्त धडक कारवाई करत सेन्सबरी पार्क परिसरातील दोन बेकऱ्यांवर अस्वच्छता आणि ड्रेनेजमध्ये सांडपाणी सोडल्याप्रकरणी प्रत्येकी २५ हजार रुपये, असा एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Jul 16, 2026 - 04:06
 0  24
कसबा पेठेत स्वच्छतेवर पालिकेचा दणका; दोन बेकऱ्यांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई
पुणे महानगरपालिका, कसबा पेठ, सेन्सबरी पार्क, गोल्डन बेकरी, इंडियन बेकरी, दंडात्मक कारवाई, स्वच्छता

पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे महानगरपालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत सेन्सबरी पार्क परिसरातील गोल्डन बेकरी आणि इंडियन बेकरी या दोन व्यावसायिक आस्थापनांवर एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

१५ जुलै रोजी प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मध्ये संयुक्त धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान संबंधित बेकऱ्यांकडून परिसरात अस्वच्छता पसरविणे तसेच अनधिकृतपणे सांडपाणी ड्रेनेज लाईन आणि नाल्यात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले.

या गंभीर नियमभंगाची दखल घेत पुणे महानगरपालिकेने दोन्ही बेकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, असा एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून तो जागेवरच वसूल करण्यात आला.

ही कारवाई उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वाघुळे, उपआयुक्त माधव जगताप आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक अमोल लांडगे, तौसीफ देशपांडे आणि चंद्रवदन गायकवाड यांच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई केली.

महानगरपालिकेने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर तसेच नागरिकांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे.

यावेळी नागरिक आणि व्यावसायिकांनी परिसर स्वच्छ ठेवून महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करावे तसेच कचरा आणि सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.