कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले.

Aug 10, 2026 - 18:54
 0  6
कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे आगमन
देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, कोल्हापूर विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर | दि. ९ ऑगस्ट २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे आज सकाळी ९.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या आगमनावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांची उपस्थिती होती.

यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाडगे, पुढारी माध्यम समूहाचे योगेश जाधव तसेच विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय तसेच विविध विकासविषयक घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या पुढील कार्यक्रमांकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.