कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव उभे; संविधानाच्या बळावर राज्य देशात अग्रस्थानी – मुंबईत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव उभे असल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी संविधानाच्या बळावर महाराष्ट्र देशात अग्रस्थानी असल्याचे प्रतिपादन केले.

May 1, 2026 - 17:31
May 1, 2026 - 17:39
 0  10
कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव उभे; संविधानाच्या बळावर राज्य देशात अग्रस्थानी – मुंबईत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
मुंबई महाराष्ट्र दिन, मंगलप्रभात लोढा, आंचल गोयल, कामगार दिन

मुंबई, दि. १ मे : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महेश हरिश्चंद्रे, महादेव किरवले, प्रशांत पानवेकर, भूमी अभिलेख अधीक्षक धनाजी धायगुडे, स्वातंत्र्यसेनानी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे योगदान अमूल्य आहे.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 30 व्या क्रमांकावर पोहोचल्याचे सांगत त्यांनी याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले. राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संविधानाच्या बळावर महाराष्ट्र अग्रस्थानी

मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून संत, विचार आणि शौर्याची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान, महात्मा फुले यांचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे.

त्या म्हणाल्या की, राज्यातील पायाभूत सुविधा या कामगारांच्या कष्टाचे फलित आहेत. शेतकरी, कारखान्यातील कामगार आणि बांधकाम क्षेत्रातील मजूर यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे.

‘ई लिज लॅण्ड’ प्रणालीचे लोकार्पण

कार्यक्रमात महसूल शाखेमार्फत तयार करण्यात आलेल्या मुंबई शहरातील भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतींच्या कामकाजासाठी ‘ई लिज लॅण्ड’ या नवीन प्रणालीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पुरस्कार वितरण

यावेळी सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर, कृष्णात पाटील आणि सुरक्षा पर्यवेक्षक प्रमोद महाले यांचा विशिष्ट सेवेसाठी कामगार विभागामार्फत मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सन 2020-21 : श्रीमती सीमा देशपांडे

सन 2021-22 : शैलजा गंटूक

सन 2022-23 : श्रीमती कुंदा फाटक

तसेच क्रीडा विभागामार्फत राही सामाजिक संस्था आणि ममता सामाजिक संस्था यांना जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी विघ्नेश मुरकर यांनाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम दे

ऊन गौरविण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.