निगडी येथे जनगणना २०२७साठी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; प्रगणक व पर्यवेक्षकांना सखोल मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागात जनगणना २०२७ मोहिमेसाठी निगडी येथे प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना तांत्रिक व क्षेत्रीय कामाचे सखोल मार्गदर्शन दिले जात असून नागरिकांनी स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

May 4, 2026 - 22:26
 0  51
निगडी येथे जनगणना २०२७साठी प्रशिक्षण शिबिरास सुरुवात; प्रगणक व पर्यवेक्षकांना सखोल मार्गदर्शन
निगडी जनगणना प्रशिक्षण, पिंपरी चिंचवड महापालिका

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात आगामी जनगणना २०२६-२७ मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हे प्रशिक्षण सुरू असून कर्मचाऱ्यांना जनगणनेचे तांत्रिक व क्षेत्रीय कामाचे सखोल मार्गदर्शन दिले जात आहे.

२५ एप्रिलपासून सुरू झालेले हे प्रशिक्षण ८ मेपर्यंत चालणार असून अ प्रभागातील एकूण १२ बॅचेसमध्ये ५२५ प्रगणकांना प्रशिक्षण दिले जात आहे. दररोज सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत प्रत्येक बॅचमधील सुमारे ५० प्रशिक्षणार्थींना तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते.

या प्रशिक्षणासाठी अनुभवी स्किल फील्ड ट्रेनर म्हणून राजू कोंढवडे, केदार शंकर, प्रणव गुरव आणि तुषार बारगे हे मार्गदर्शन करत आहेत.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे, अ प्रभाग अधिकारी निवेदिता घारगे तसेच इतर अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की, जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य असून १ ते १५ मे दरम्यान नागरिकांनी स्वतःची स्वगणना ऑनलाइन पूर्ण करावी. तसेच १६ मेनंतर प्रगणक घरी भेट देतील तेव्हा अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.

या प्रशिक्षणात प्रगणक बाळू महाजन, गोरक्ष पवार, संदीप बोंबले, राजेंद्र पाटील, बाबुराव भोसले, दीपाली मोहिते, डॉ. माधुरी पवार, नीता वाघमारे, तनुजा नेमाडे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रास्ताविक बाळू महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाम पोटघन यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0