छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रामसेज किल्ल्यावर एक लाख सीड बॉल उधळण

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नाशिकच्या रामसेज किल्ला परिसरात डी.एस.एफ. फाउंडेशन, लाख मराठा प्रतिष्ठान आणि विश्वमंगल मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख सीड बॉल उधळण उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

May 14, 2026 - 20:08
 0  96
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रामसेज किल्ल्यावर एक लाख सीड बॉल उधळण
रामसेज किल्ला, सीड बॉल उधळण, छत्रपती संभाजी महाराज जयंती,

नाशिक ब्यूरो 

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त नाशिक येथील रामसेज किल्ला परिसरात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. डी.एस.एफ. फाउंडेशन, लाख मराठा प्रतिष्ठान आणि विश्वमंगल मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य कार्यक्रमात तब्बल एक लाख सीड बॉलची उधळण करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत आणि निसर्ग संवर्धन ही काळाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या सीड बॉलमध्ये बाभूळ, चिंच, विलायती चिंच, करवंदे, मोह, सिताफळ, रामफळ, हीवर, बोर, करंजी आणि शिरस या विविध वृक्षांच्या बियांचा समावेश करण्यात आला होता.

सकाळी ७ वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. या उपक्रमासाठी देवीदास पवार, सुशील देशमुख आणि संपतराव देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच मराठा महासंचाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, क्रीडा संघटक व उपक्रमाचे प्रमुख आयोजक अशोक दुधारे, राजेंद्र शेळके, प्राचार्य ढगे, कवयित्री व निसर्गप्रेमी सौ. विजया दुधारे, राजू शिंदे, अशोक कदम, आनंद खरे, रमेश मारवाडी, दीपक निकम, राधिका महिला मंडळाच्या प्रमुख चेतना शर्मा, शुभांगी कुलकर्णी, अश्वमेघ अकॅडेमीचे संचालक मनीष बोरस्ते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामसेज किल्ला परिसरात एक लाख सीड बॉलची उधळण करण्यात आली. यावेळी देवीदास पवार, चंद्रकांत बनकर आणि अशोक दुधारे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती संभाजी महाराज यांचे महान कार्य तसेच रामसेज किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व याविषयी माहिती दिली.

तर सौ. विजया दुधारे यांनी पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे सांगत सामाजिक उपक्रमांसोबत निसर्ग संवर्धनालाही प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.