रामशेज किल्ल्यावर १४ मे रोजी एक लाख सीडबॉल उधळण; संभाजी महाराज जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १४ मे रोजी नाशिकच्या रामशेज किल्ला परिसरात एक लाख सीडबॉल उधळण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

May 12, 2026 - 23:13
May 12, 2026 - 23:17
 0  5
रामशेज किल्ल्यावर १४ मे रोजी एक लाख सीडबॉल उधळण; संभाजी महाराज जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश
रामशेज किल्ला, सीडबॉल उधळण, छत्रपती संभाजी महाराज जयंती,

नाशिक ब्यूरो 

नाशिकमधील ऐतिहासिक रामशेज किल्ला परिसरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १४ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता एक लाख सीडबॉल (बियांचे गोळे) उधळण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मराठा प्रतिष्ठान, दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि विश्वमंगल मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

१४ मे हा धर्मवीर, रणधुरंधर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती दिन असून, त्यांच्या महान कार्याला मानवंदना देण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

रामशेज किल्ल्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, दुर्गसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीदेखील याच परिसरात ५० हजार सीडबॉल उधळण कार्यक्रम घेण्यात आला होता.

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली असून, येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन व्हावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे युवकांमध्ये दुर्गप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी विविध शाळा-महाविद्यालयांचे खेळाडू, शिक्षक, पालक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.