खंडणीसाठी फर्निचर व्यावसायिकावर गोळीबार प्रकरण; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तीन आरोपी ताब्यात
खंडणी न दिल्याच्या कारणावरून फर्निचर व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पूर्ण केला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड | दि. २१ मे २०२६
खंडणीची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून फर्निचर व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाला मोबाईलद्वारे तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित फर्निचर व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींच्या हालचाली, वास्तव्य आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. �
Press Note Ravet 167 - 2026.pdf
तपासादरम्यान आरोपींच्या वास्तव्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने बाहेरगावी जाऊन कारवाई केली. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्यातील सहभाग मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून गुन्ह्याशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे. आरोपींना मदत करणारे किंवा कटात सहभागी असलेल्यांचा देखील शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने तपास करत ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
