रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती; ₹६,००० कोटींच्या डीपीआरला मंजुरी, लवकरच कामाला सुरुवात

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे ₹६,००० कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) मंजुरी दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

Jul 19, 2026 - 02:49
 0  10
रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती; ₹६,००० कोटींच्या डीपीआरला मंजुरी, लवकरच कामाला सुरुवात
रावेत नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर, रावेत नऱ्हे महामार्ग, नितीन गडकरी,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड,: दि. १८ जुलै : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय ठरणाऱ्या रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे–सातारा महामार्गावरील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ₹६,००० कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) मंजुरी दिली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिवेशनात मांडत रावेत ते नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर तातडीने मंजूर करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

रावेत–नऱ्हे एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी पार्क, पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दररोज हजारो वाहनचालकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल. तसेच औद्योगिक, आयटी आणि व्यावसायिक क्षेत्रांनाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे.

राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्षात येत असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन उभारला जाणारा हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर घालणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0