भाषा वादाऐवजी मराठी शिकण्याचा संकल्प करावा - सचिनभाऊ लोंढे

भाषा वाद निर्माण करण्याऐवजी मराठी शिकण्याचा सकारात्मक संकल्प करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) युवक जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी मुंबईत केले. महागाई, बेरोजगारी आणि महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Apr 25, 2026 - 23:47
 0  4
भाषा वादाऐवजी मराठी शिकण्याचा संकल्प करावा - सचिनभाऊ लोंढे
सचिनभाऊ लोंढे

मुंबई, प्रतिनिधी - उदय कासारे: रिक्षाचालक हा सर्वसामान्य नागरिक असून तो मराठी भाषा नक्कीच शिकेल, मात्र त्याच्या नावावर राजकारण करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी व्यक्त केले. संप करण्यापेक्षा मराठी शिकण्याचा सकारात्मक संकल्प केल्यास भाषा वाद आपोआप मिटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर भारतीय समाजबांधवांना उद्देशून बोलताना लोंढे म्हणाले, काही राजकीय पक्ष केवळ निवडणुकांच्या काळात तुमचा वापर करत आहेत, हे ओळखण्याची गरज आहे. बाजारपेठेतील छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत असताना भाषा वाद उकरून काढून समाजात तणाव निर्माण केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

सध्याच्या घडीला महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला अत्याचार आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठीच सत्ताधारी पक्षांकडून भाषा वादासारखे मुद्दे पुढे आणले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

शेवटी नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले, मित्रांनो सावध रहा. महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे आजची खरी गरज आहे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मराठी भाषेचा आदर राखत ती शिकणे आवश्यक आहे. अनेक समाजबांधव उत्तम मराठी बोलतात, याचा अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 1
Wow Wow 0