भाजप प्रदेश प्रवक्ते व माध्यम विभाग प्रमुखांची घोषणा; गोविंद बोरसे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

भाजप महाराष्ट्र प्रदेशाने प्रवक्ते आणि माध्यम विभाग प्रमुखांची घोषणा केली असून गोविंद बोरसे यांची सलग तिसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुखपदी निवड झाली आहे.

Apr 21, 2026 - 20:54
 0  9
भाजप प्रदेश प्रवक्ते व माध्यम विभाग प्रमुखांची घोषणा; गोविंद बोरसे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड
भाजप महाराष्ट्र, प्रदेश प्रवक्ते

नाशिक/प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने प्रवक्ते व माध्यम विभाग प्रमुखांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकमधून लक्ष्मण सावजी आणि अजित चव्हाण यांची प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुखपदी गोविंद बोरसे यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, केशव उपाध्ये, डॉ. भारती पवार, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तसेच पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

निवडीनंतर बोलताना गोविंद बोरसे यांनी सांगितले की, पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल ते आभारी असून माध्यम विभागाची रचना जिल्हा व मंडल स्तरापर्यंत प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल. तसेच पक्षाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

दरम्यान, विभागीय प्रसिद्धीप्रमुख म्हणून कोकणसाठी सतीश धारप, ठाण्यासाठी दीपेश म्हात्रे, पालघरासाठी समीर पाटील, पूर्व विदर्भासाठी कल्पना नालष्कर, पश्चिम विदर्भासाठी अनु शर्मा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी संजय मयेकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातून प्रदेश प्रवक्ते म्हणून विश्वास पाठक, अवधूत वाघ, श्वेता शालिनी, शिवराय कुलकर्णी, विनोद वाघ, अतुल शहा, गणेश हाके, कुणाल टिळक, विनायक आंबेकर, राजीव पांडे, पंकज मोदी, जितेन गजरिया, प्रीती गांधी, शिवानी दानी, अजय पाठक, समीर भाकरे यांच्यासह इतरांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0