मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील नर्सरीबाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नूतनीकरण केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर | दि. ९ ऑगस्ट २०२६
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरीबाग येथील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या आणि लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधीस्थळी आदरांजली वाहिली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
तसेच खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अशोकराव माने, राहुल आवाडे, महापौर रूपाराणी निकम, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाहू समाधीस्थळ परिसरात नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले.
शाहू समाधीस्थळाच्या विकासाअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली असून, त्यापैकी पूर्ण झालेल्या कामांची तसेच नियोजित विकासकामांची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी यावेळी दिली.
समाधीस्थळाच्या विकासामुळे परिसराला अधिक सुबक आणि ऐतिहासिक वारशाला साजेसे स्वरूप प्राप्त होत असून, येथे येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध कामे करण्यात येत आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समता, शिक्षण, लोककल्याण आणि पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याच्या दृष्टीने समाधीस्थळाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाच्या विकासकामांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाधीस्थळी दर्शन आणि सभागृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्याने शाहू समाधीस्थळ विकासाच्या कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1