गडचिरोलीत व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदानासाठी प्रस्ताव मागविले
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यायामशाळा, क्रीडांगण विकास आणि युवक कल्याण योजनांसाठी ३० मे २०२६ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
गडचिरोली | प्रतिनिधी (दि. ७ मे २०२६)
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत सन २०२६-२७ साठी व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडांगण विकास अनुदान योजना आणि युवक कल्याण विषयक अनुदान योजनांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
तरुण पिढीत व्यायामाची आवड निर्माण करून शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
व्यायामशाळा विकास योजनेंतर्गत नवीन व्यायामशाळा बांधकामासाठी अनुदान दिले जाणार असून इनडोअर व्यायाम साहित्य आणि ओपन जिम साहित्य पुरवठाही करण्यात येणार आहे.
तसेच क्रीडांगण विकास योजनेंतर्गत क्रीडांगण समतलीकरण, २०० व ४०० मीटर धावपट्टी, विविध खेळांसाठी प्रमाणित मैदाने, प्रसाधनगृहे, पाण्याची सुविधा, कुंपण आणि इतर आवश्यक सुविधा विकसित करण्यासाठी संबंधित शाळा व संस्थांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, ग्रामपंचायती आणि शासकीय संस्था यांनी विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव ३० मे २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावेत.
विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खुल्या व्यायामशाळा (ओपन जिम) उभारण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

