इक्का’ चित्रपटाच्या यशाबद्दल निर्माते प्रेमकिशन मल्होत्रा यांचे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनकडून अभिनंदन
सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘इक्का’ चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळालेल्या यशाबद्दल निर्माते प्रेमकिशन प्रेमनाथ मल्होत्रा यांचे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
मनिषा गुरव:- चीफ एडिटर
मुंबई : सनी देओल आणि अक्षय खन्ना यांसारख्या दमदार कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘इक्का’ या हिंदी चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळालेल्या उल्लेखनीय यशाबद्दल चित्रपटाचे निर्माते प्रेमकिशन प्रेमनाथ मल्होत्रा यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई अध्यक्ष देवेंद्र पंडित आणि त्यांची कन्या मिस दीपशिका पंडित यांनी प्रेमकिशन मल्होत्रा यांची त्यांच्या वांद्रे येथील पाली हिल निवासस्थानी भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा यांनाही ‘इक्का’ चित्रपटाच्या यशाबद्दल भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रेक्षकांनी ‘इक्का’ चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे अल्पावधीतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर १०.१ दशलक्ष तासांचा पाहण्याचा टप्पा गाठल्याचा दावा करण्यात आला असून, या कामगिरीमुळे चित्रपटाने नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे सांगण्यात आले आहे.
कोईमोई डॉट कॉम या खासगी मनोरंजनविषयक संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील १६ देशांमध्ये ‘इक्का’ चित्रपट ट्रेंडिंग राहिला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे कलाकारांसह निर्माते आणि दिग्दर्शकांचेही कौतुक होत आहे.
२९ वर्षांनंतर सनी देओल-अक्षय खन्ना जोडी पुन्हा एकत्र
‘इक्का’ चित्रपटाच्या माध्यमातून सनी देओल आणि अक्षय खन्ना ही लोकप्रिय जोडी तब्बल २९ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यापूर्वी दोघेही ‘बॉर्डर’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्या चित्रपटाला देशभरात प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
‘इक्का’च्या माध्यमातून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून, ओटीटीवरील चित्रपटाच्या यशामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चित्रपट क्षेत्रातील देवेंद्र पंडित यांचे दीर्घ योगदान
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई अध्यक्ष देवेंद्र पंडित हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चित्रपट युनियनमध्ये कार्यरत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या मिस दीपशिका पंडित यादेखील चित्रपटसृष्टीत पडद्यामागील विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अल्पावधीतच त्यांनी या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्याचेही विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
‘इक्का’ चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादामुळे निर्माते प्रेमकिशन मल्होत्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा यांचे अभिनंदन करण्यात येत असून, चित्रपटाच्या पुढील यशासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0