देशातील १,०५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर; महाराष्ट्रातील ८२ जणांचा गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमधील १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केली. महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

Aug 14, 2026 - 21:16
Aug 22, 2026 - 18:37
 0  15
देशातील १,०५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर; महाराष्ट्रातील ८२ जणांचा गौरव
शौर्य पदक 2026, सेवा पदक 2026, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचारी, केंद्रीय गृह मंत्रालय, पोलीस शौर्य पदक,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. १४ ऑगस्ट २०२६ : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

कर्तव्य बजावताना जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्हे रोखणे किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय शौर्यपूर्ण कार्याबद्दल शौर्य पदक प्रदान केले जाते. यंदा देशभरात एकूण ३०१ शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये २७२ पोलीस कर्मचारी आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना, अशा एकूण ३३ जणांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

विशिष्ट सेवेसाठी ९२ राष्ट्रपती पदके

सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवेसाठी (PSM) प्रदान केले जाते. यंदा देशभरात या श्रेणीतील ९२ पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ८३ पोलीस सेवा, ४ अग्निशमन सेवा, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि दोन सुधारात्मक सेवा कर्मचारी, अशा एकूण पाच जणांना राष्ट्रपती पदक – विशिष्ट सेवेसाठी जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६४ पदके

कौशल्यपूर्ण कार्यपद्धती, कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उल्लेखनीय सेवेसाठी पदक – गुणवत्तापूर्ण सेवेसाठी (MSM) प्रदान केले जाते. देशभरात यंदा या श्रेणीतील ६६४ पदके जाहीर झाली आहेत.

यामध्ये ६०६ पोलीस सेवा, २८ अग्निशमन सेवा, १८ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा आणि १२ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ३७ पोलीस कर्मचारी, २ अग्निशमन सेवा कर्मचारी, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचारी, अशा एकूण ४४ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील शौर्य पदक प्राप्त अधिकारी-कर्मचारी

शौर्य पोलीस सेवा (GM)

राजू पांडुरंग गवळी – पोलीस उपनिरीक्षक

वासुदेव राजम मडावी – पोलीस उपनिरीक्षक

दिलीप विठ्ठल आत्राम – नाईक पोलीस शिपाई

अजय गोपाळराव मडावी – पोलीस शिपाई

गणेश चंद्रम दुब्बुला – पोलीस शिपाई

विजय झरू मडावी – पोलीस शिपाई

भूपेश मारोत्राव जुनमाके – पोलीस शिपाई

दलसू कटिया बोगामी – पोलीस शिपाई

राजेश शामराव किरांगे – पोलीस शिपाई

मसा बोरा अत्राम – नाईक पोलीस शिपाई

यतिश विजयराव देशमुख, भापोसे – अतिरिक्त पोलीस अधीक्षक

विजय किश्तय्या कोडपे – पोलीस हवालदार

दशरथ रामशहा मडावी – नाईक पोलीस शिपाई

राकेश राजम बेडकी – पोलीस शिपाई

सुधाकर जगन पोर्टे – पोलीस शिपाई

श्रीनिवास समय्या निष्टुरी – पोलीस शिपाई

गणेश हनमंतु गजीवार – पोलीस शिपाई

नितेश प्रभुदास टेंबेकर – पोलीस शिपाई

शिवाजी मेस्सो हिचामी – पोलीस शिपाई

संजय मल्लेश कंकाबंदवार – पोलीस शिपाई

महाराष्ट्रातील १३ अग्निशमन कर्मचाऱ्यांना शौर्य पदक

मनोज विश्वनाथ सावंत – विभागीय अग्निशमन अधिकारी

रवींद्र नारायणराव आंबुलेकर – मुख्य अग्निशमन अधिकारी

अनिल वसंत परब – उपमुख्य अग्निशमन अधिकारी

ईश्वर खंडू कांबळे – वरिष्ठ स्थानक अधिकारी

योगेश हिरालाल पवार – स्थानक अधिकारी

दत्तात्रय अशोक भोसले – स्थानक अधिकारी

महेश आनंद गुदलकर – चालक-परिचालक

चिंतामणी शिवाजी खांडेकर – अग्निशामक

विकी नागेश सरवदे – अग्निशामक

दर्शन घनश्याम पावडे – अग्निशामक

रमेश जीवन कोळी – अग्निशामक

राजेश विष्णू राणे – चालक-परिचालक

हर्षल शंकर कटके – अग्निशामक

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी

पोलीस सेवा

श्री. शिरीष रवींद्र जैन – अतिरिक्त पोलीस महासंचालक

श्री. सुभाष नानासाहेब भुजंग – पोलीस उपअधीक्षक

श्री. संजय राजाराम वायचळे – सहायक पोलीस उपनिरीक्षक

सुधारात्मक सेवा

श्री. संजीव सखाराम घाणेकर – सुभेदार

श्री. संजय राजारामजी तलवारे – हवालदार

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्रातील ४४ जणांचा गौरव

पोलीस सेवा

संजय बाजीराव जाधव – उपमहानिरीक्षक

विजयकुमार गोपीनाथ मगर – उपमहानिरीक्षक

दिगंबर पांडुरंग प्रधान – पोलीस अधीक्षक

प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

भागीरथ शिवाजी देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

प्रवीण विनायक तेजाळे – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

मनोजकुमार माधवराव यादव – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

वैभवकुमार जगदेवराव जाधव – पोलीस निरीक्षक

संतोष धनसिंग बर्गे – पोलीस निरीक्षक

विश्वजीत वसंत कैगडे – पोलीस निरीक्षक

जितेंद्र आनंद कदम – पोलीस निरीक्षक

जनार्दन यशवंत देसाई – पोलीस उपनिरीक्षक

अंकुश बाबालाल न्यायनिर्गून – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

विलास हनुमानराव इंगळे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

मुजफ्फर अली जाफर अली सय्यद – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

विनोद प्रभाकर पाटील – पोलीस निरीक्षक

दिलीप भीमा धुमणे – पोलीस उपनिरीक्षक

मोहन अण्णासाहेब सौदणे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

दिपक अनंत ठाकूर – पोलीस उपनिरीक्षक

संपत मुरलीधर खैरे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

गुलाब प्रभाकर सोनार – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

शेखर दशरथ फार्टले – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

शेरखान दिलावरखान पठाण – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

सुनील निवृत्ती कदम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

शैलेश चंद्रकांत उपासनी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

प्रकाश बळीराम कदम – पोलीस उपनिरीक्षक

चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर – पोलीस उपनिरीक्षक

दिनेश विश्वनाथ बडगुजर – पोलीस उपनिरीक्षक

अरुण पाट्रुजी आत्राम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

शिवानंद महादेव स्वामी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

पांडुरंग बाप्पाजी पाटील – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

अनवरअली सय्यदअली सय्यद – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

गणेश शंकर शिंदे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

मनोज गोपाळराव मांगरूळकर – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

प्रदीप वसंतराव चौगांवकर – पोलीस निरीक्षक

भारत खिमजी गोहिल – हेड कॉन्स्टेबल

राजकुमार यादवराव जनबंधू – हेड कॉन्स्टेबल

अग्निशामक सेवा

शंकर उत्तम मिसाळ – मुख्य अग्निशमन अधिकारी

शैलेश महादेव जगताप – अग्निशामक

नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा

पोपट रामजी सांगदे – वरिष्ठ कर्मचारी अधिकारी

अशोक नामदेव इंगळे – गृहरक्षक

मनोज सदाशिव बरसागडे – गृहरक्षक

सुधारात्मक सेवा

विकास हनमंतू राजनळवार – अधीक्षक गट-ब

महेश लक्ष्मण गडनाईक – हवालदार

महाराष्ट्रातील ८२ जणांचा गौरव

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील एकूण ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये ३३ जणांना शौर्य पदक, ५ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि ४४ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहे.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेपासून नागरिकांच्या जीविताचे रक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांपर्यंत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली ही पदके संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाचा गौरव करणारी आहेत.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.