राजधानीत महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन; महाराष्ट्र सदनात पुष्पांजली अर्पण
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन. अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती.
नवी दिल्ली | दि. ११ :
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राजधानी नवी दिल्ली येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे तसेच व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाद्वारे महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0