नाशिक धर्मांतर प्रकरण: सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; महिला आरोपीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतर प्रकरणात सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी; महिला आरोपी आश्विनी चैनानीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी.

Apr 11, 2026 - 03:30
 0  3
नाशिक धर्मांतर प्रकरण: सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; महिला आरोपीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक धर्मांतर प्रकरण,

नाशिक मधील कॉर्पोरेट कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक 163/2026 अंतर्गत अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी आश्विनी अशोक चैनानी हिला पुणे येथून अटक करून नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकरणात एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून न्यायालयीन कोठडीतील आरोपींना ट्रान्सफर वॉरंटद्वारे इतर गुन्ह्यांतही पोलीस कोठडीसाठी हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गंभीर आरोप मांडले. आरोपींनी पीडितांना रोजा पाळण्यास, नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचे तसेच गोमांस खाण्यास भाग पाडल्याचे त्यांनी सांगितले. तरुणींसह तरुणांचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच नोकरी व पैशाचे आमिष दाखवून आणि वैयक्तिक माहितीचा वापर करून पीडितांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबई पोलीस पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून तपास सुरू आहे. दरम्यान, पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0