कोल्हापूरात महात्मा फुले जयंती उत्साहात; सामाजिक न्याय विभागाकडून अभिवादन, विद्यार्थ्यांची रॅली

कोल्हापूरात महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून अभिवादन कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांची भव्य रॅली. विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Apr 12, 2026 - 03:26
 0  5
कोल्हापूरात महात्मा फुले जयंती उत्साहात; सामाजिक न्याय विभागाकडून अभिवादन, विद्यार्थ्यांची रॅली
कोल्हापूरात महात्मा फुले जयंती उत्साहात

कोल्हापूर | दि. ११ (जिमाका) :

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त कोल्हापूरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागातर्फे बिंदू चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. बी. जी. खराडे महाविद्यालयाच्या वतीने पालखीमधून विविध ग्रंथ ठेवत मुलींची भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली महात्मा फुले पुतळा ते राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळापर्यंत पार पडली.

या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे अधिकारी संभाजी पवार, सचिन पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते गणी आजरेकर, आलोक जत्राटकर, विजय देवणे, डी. जी. भास्कर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने कंदलगाव येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. मंजुश्री पवार यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास सहायक संचालक सुनिता नेर्लीकर, अधिकारी अमित घवले तसेच विभागातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.