देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर. विमला यांच्या ‘जियो मन’ काव्यसंग्रहाचे नवी दिल्लीत प्रकाशन

नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर. विमला यांच्या ‘जियो मन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन. साहित्य संमेलनात मान्यवरांची उपस्थिती.

Apr 12, 2026 - 17:49
 0  3
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर. विमला यांच्या ‘जियो मन’ काव्यसंग्रहाचे नवी दिल्लीत प्रकाशन
विमला यांच्या ‘जियो मन’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नवी दिल्ली | दि. ११ :

महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या ‘जियो मन’ या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे दिमाखदार सोहळ्यात पार पडले.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित ‘प्रथम अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन’च्या उद्घाटन सत्रात हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ लेखिका लीना मेहंदळे, माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, सहमहालेखा नियंत्रक सुप्रिया देवस्थळी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘जियो मन’ हा काव्यसंग्रह मानवी जीवनातील संघर्ष, आशावाद आणि भावविश्वाचे प्रतिबिंब दर्शवतो. मूळ तामिळ भाषिक असलेल्या आर. विमला यांनी हिंदी भाषेत प्रभावीपणे भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेम, वेदना, स्मृती आणि संघर्ष यांचे विविध पैलू या कवितांमधून उलगडतात.

तीन दशकांच्या प्रशासकीय सेवेत महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य त्यांच्या लेखनातून जाणवते. साधी आणि प्रभावी शैली हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य असून ‘जियो मन’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे. यापूर्वी ‘मन रचनाएं’ या संग्रहालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला हो

ता.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0