महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात मराठीला प्रोत्साहन देण्याचा सूर; विविध पुस्तकांचे प्रकाशन

नवी दिल्लीतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यावर भर. विविध पुस्तकांचे प्रकाशन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश.

Apr 12, 2026 - 02:57
Apr 12, 2026 - 03:16
 0  3
महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात मराठीला प्रोत्साहन देण्याचा सूर; विविध पुस्तकांचे प्रकाशन
दिल्ली पुस्तकांचे प्रकाशन

नवी दिल्ली :

देशभरातील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या प्रसारासाठी आणि साहित्य निर्मिती अधिक सुलभ करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या. संगणक प्रणालीवर मराठी लेखन सुलभ करणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि संस्कृत भाषेचे संवर्धन करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी मराठी साहित्यातील महिला साहित्यिकांचे योगदान अधोरेखित करत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिला साहित्यिकांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनात महिलांचा वाढता सहभाग प्रशासन अधिक लोकाभिमुख करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांनी या महिला अधिकारी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. देशभरातील महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच या पहिल्या उपक्रमाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाराणी ताराबाई यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तलवारीपेक्षा लेखणीचे महत्त्व अधिक असल्याचे या संमेलनातून अधोरेखित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी केले. यावेळी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी निलांबरी जगदाळे तसेच निवृत्त अधिकारी अरुणा लिमये यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जिओ मेरे मन’, ‘ऑल टाइम रिफ्लेक्शन ऑन चेंजिंग इंडिया’, ‘लीगल ऑफ भिडे वाडा’, ‘महाराणी ताराराणी’, ‘मधुमालती’ आणि ‘अंतरणात’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी केले 

 

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0