घोडबंदर समुद्रकिनाऱ्यावर चौपाटी प्रकल्पाविरोधात नागरिक आक्रमक; पुनर्वसनाबाबत प्रश्नचिन्ह

घोडबंदर समुद्रकिनाऱ्यावर चौपाटी प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक. विस्थापन, भरपाई आणि पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित.

Apr 12, 2026 - 18:51
 0  3
घोडबंदर समुद्रकिनाऱ्यावर चौपाटी प्रकल्पाविरोधात नागरिक आक्रमक; पुनर्वसनाबाबत प्रश्नचिन्ह
घोडबंदर समुद्रकिनाऱ्यावर चौपाटी प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक. विस्थापन, भरपाई आणि पुनर्वसनाबाबत प्रश्न उपस्थित.

मुंबई | प्रतिनिधी दिपक शिंदे :

घोडबंदर गावातील समुद्रकिनाऱ्याची पाहणी करण्यात आली असता स्थानिक नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या समोर आल्या. नागरिकांची कोणतीही मागणी नसताना येथे चौपाटी उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ही जागा मॅरिटाईम हद्दीत असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक रेती व्यवसाय, बोट बांधणी, लॉन्ड्री आदी उपजीविकेचे व्यवसाय करत आहेत. याशिवाय या परिसरात घरे, दुकाने, स्मशानभूमी तसेच इ.स. १८६० मधील प्राचीन शिवमंदिर देखील अस्तित्वात आहे.

अचानक चौपाटी प्रकल्पासाठी नागरिकांना विस्थापित करण्याचा प्रस्ताव समोर आल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. “भरपाई किती मिळणार?”, “पुनर्वसन कुठे होणार?” असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने भौतिक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी चौपाटी प्रकल्प मर्यादित क्षेत्रात (सुमारे ५०० मीटर) किंवा उपलब्ध रिक्त जागेतच राबवावा, संपूर्ण किनारपट्टी व्यापू नये, अशी मागणी केली आहे. स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करतच विकास व्हावा, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या प्रसंगी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेविका विजया वैती, माजी उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच मिरा भाईंदर महानगरपालिका चे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0