भाजपच्या विजयाचा जल्लोष; कुळगाव बदलापूरमध्ये पेढे वाटून साजरा आनंदोत्सव
पश्चिम बंगाल, पांडिचेरी आणि आसाममध्ये भाजपच्या विजयाचा आनंद कुळगाव बदलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला.
कुळगाव बदलापूर : पश्चिम बंगाल, पांडिचेरी आणि आसाम येथे भारतीय जनता पार्टी ला मिळालेल्या यशाचा आनंद कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे, नगरसेवक राजेंद्र घोरपडे, गटनेते शरदजी तेली, अध्यक्ष रमेश सोलसे, युवा अध्यक्ष तेजस म्हस्कर तसेच प्रशांत कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. या विजयाला जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि देशभक्तीची भावना यांचे फलित असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.
नेत्यांनी सांगितले की, हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. “जनतेचा विश्वास… देशाचा विकास!” या घोषवाक्याने कार्यक्रमाचा उत्साह अधिक वाढवला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
1
Love
0
Funny
1
Angry
0
Sad
0
Wow
0
