वाचन संस्कारातून घडणार सुदृढ समाज; ‘मराठी उपासक’ परीक्षेत २५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण

मराठी उपासक परीक्षा, नाशिक बातम्या, वाचन संस्कार, विद्यार्थी यश, मराठी भाषा उपक्रम, कुसुमाग्रज विचार मंच, शिक्षण उपक्रम

Apr 10, 2026 - 23:34
 0  0
वाचन संस्कारातून घडणार सुदृढ समाज; ‘मराठी उपासक’ परीक्षेत २५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
वाचन-संस्कार-मराठी-उपासक-परीक्षा-विद्यार्थी-उत्तीर्ण-नाशिक

नाशिक (ब्युरो): “स्वाभिमानी, सुदृढ आणि सजग समाज निर्माण करण्यासाठी केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही, तर प्रत्येकावर वाचन संस्कार होणे काळाची गरज आहे,” असे मत कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे अध्यक्ष सतीश प्रेमचंद बोरा यांनी व्यक्त केले. ‘मराठी उपासक’ उपक्रमांतर्गत आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला नांदगाव येथील समाजसेवक जगन्नाथ काशिनाथ साळुंके, उद्योगपती व समाजसेवक नरेंद्र कचरदास पारख तसेच संपत वाघ आणि रमेश वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने सुमारे ७५ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. आतापर्यंत सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी ‘मराठी उपासक’ परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली असून हा उपक्रम आता चळवळीचे रूप धारण करत आहे.

तालुक्यातील राजापूर (येवला) आणि लोह शिंगवे (नांदगाव) येथे पदवी प्रदान समारंभ पार पडले. या दोन्ही केंद्रांवर सुमारे २०० विद्यार्थ्यांना ‘मराठी उपासक’ पदवी प्रदान करण्यात आली.

राजापूर येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या विद्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक संपत वाघ, रमेश वाघ तसेच मुख्याध्यापक आर. बी. काकड यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:विद्यार्थ्यांमध्ये भाषेची ओढ निर्माण व्हावी आणि मराठीचा जागर घराघरात पोहोचावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0